sports

जिल्ह्यात आणखी 962 कोरोनाबाधित

शुक्रवारी सर्वाधिक 1280 जण कोरोनामुक्त : 24 बाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 29,115

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 962 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण रुग्णसंख्या आता 29,115 इतकी आहे. तर दि. 18 रोजी उच्चांकी 1280 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 962 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण रुग्णसंख्या आता 29,115 इतकी आहे. तर दि. 18 रोजी उच्चांकी 1280 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात उच्चांकी 1280 जण कोरोनामुक्त 
शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 1280 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1160 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व.  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, उपजिल्हा रुग्णालय, कराड 21, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 50, कोरेगाव 126, वाई 85, खंडाळा 74, रायगाव 106,  पानमळेवाडी 212, मायणी 103, महाबळेश्‍वर 55, दहिवडी 41, खावली 45, तळमावले 26 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 182 अशा एकूण 1160 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.