जिल्ह्यात दिवसभरात 141 कोरोनाबाधित
मंगळवारी 3 बाधितांचा मृत्यू : 32 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,296
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 141 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 32 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 141 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 32 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 32 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 32 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
291 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कराड 14, फलटण 10, कोरेगाव 23, वाई 27, खंडाळा 19, रायगाव 37, पानमळेवाडी 24, मायणी 8, दहिवडी 8, म्हसवड 18, पिंपोडे 6, तरडगाव 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 64 अशा एकूण 291 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


