खळखळून हसत करूया नव्या वर्षाचं स्वागत!
महाराष्ट्राची हास्यजत्रा, न्यू इयर स्पेशल फक्त सोनी मराठीवर
सरत्या वर्षाला निरोप देत वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा न्यू इयर स्पेशल कार्यक्रम प्रेक्षकांना ३१ डिसेंबर रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात आणि हास्यजत्रा चमू हे या विशेष भागात प्रेक्षकांना हसवणार आहेत. नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव येथे या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले आहे. यानिमित्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर आणि सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता माळी यांनी खास वऱ्हाडी भाषेत नागपूरकरांशी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉ. विलास डांगरे, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, उपायुक्त पखाले, कांचन गडकरी, वरिष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, गजानन निमदेव, संदीप भारंबे, हॉटेल अशोकचे सीएमडी संजय गुप्ता, दीपेन अग्रवाल, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या रणरागिणी छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या स्वराज्याच्या महाराणी ताराराणी ह्यांच्यावर आधारित नाट्यप्रवेश यावेळी सादर करण्यात आला. ताराराणींनी 'हर हर महादेव'चा गजर करताच उपस्थित प्रेक्षकांनीही तिच्या सुरात सूर मिसळला.
इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमातील सध्या गाजत असलेले टॉप १२ मधील स्पर्धक कैवल्य केजकर, जगदीश चव्हाण, भाग्यश्री टिकले यांनी कार्यक्रमात विविध गीते सादर केली. अजूनही बरसात आहे', 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी', 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेतील कलाकार उमेश कामत, मुक्ता बर्वे, स्वरदा थिगळे आणि मधुरा वेलणकर यांनी यावेळी उपस्थित राहून प्रेक्षकांशी सवांद साधला.
कार्यक्रमाचं संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रा.अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा न्यू इयर स्पेशल ३१ डिसेंबर, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.