sports

जिल्ह्यात दिवसभरात 245 कोरोनाबाधित

गुरुवारी 8 बाधितांचा मृत्यू : 575 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 44,655

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 245 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 575 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 245 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 575 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 575 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 575 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

331 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41, कराड 10, फलटण 15, कोरेगाव 51, वाई 31, खंडाळा 18, रायगाव 17, पानमळेवाडी 21, महाबळेश्‍वर 5, पाटण 9, खावली 27, पिंपोडे 27, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 59 अशा एकूण 331 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.