प्रत्येक अभिनेत्यांच एक वैशिष्ट असतं, कोणाचा आवाज, कोणाचे अॅक्शन सीन, कोणामध्ये असलेली डान्सची कला तर कोणाचा दमदार आवाज. राणीचा आवाज हा सगळ्यात वेगळा आणि शांत असा आहे. मात्र, राणी सुरूवातीच्या काळात तिच्या आवाजामुळे वादाच्या भोवर्यात अडकली होती.
एकेकाळी बॉलिवूड गाजवणार्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचा समावेश आहे. आज राणीचा 43वा वाढदिवस आहे. रानीचा जन्म 21 मार्च 1978 साली कोलकातामध्ये एका बंगाली कुटूंबात झाला होता. लहानपणापासून रानीला अभिनयाची आवड होती. राणीचे वडील राम मुखर्जी हे बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शक होते. त्यामुळे राणीचा लहानपणापासून चित्रपटसृष्टीसोबत एक वेगळाच संबंध आहे. प्रत्येक अभिनेत्यांच एक वैशिष्ट असतं, कोणाचा आवाज, कोणाचे अॅक्शन सीन, कोणामध्ये असलेली डान्सची कला तर कोणाचा दमदार आवाज. राणीचा आवाज हा सगळ्यात वेगळा आणि शांत असा आहे. मात्र, राणी सुरूवातीच्या काळात तिच्या आवाजामुळे वादाच्या भोवर्यात अडकली होती.
राणीला खरी प्रसिद्धी ही अभिनेता आमिर खानच्या ‘गुलाम’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर सर्वत्र राणीला खंडाळा गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्याच चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ हे गाणं आज ही लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटातील राणीच्या भूमिकेने तर सगळ्यांची मने जिंकली होती. मात्र, या चित्रपटातील राणीचा आवाज हा तिचा खरा आवाज नाही. या चित्रपटात राणीचा जो आवाज आहे तो एका डबिंग आर्टिस्टचा आवाज आहे.
राणीने ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर राणीला खरी पसंती ही बॉलिवूडचा किंग खान आणि काजोलचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ यातून मिळाली होती. राणीने आता पर्यंत अनेक दमदार चित्रपट दिले आहे.