आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम करणा-या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या आयुष्याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला मिळतात.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम करणा-या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या आयुष्याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला मिळतात. यामधील 6 रंजक किस्से...
जयललितांसोबत केले होते काम
श्रीदेवी यांनी हिंदीसह तामिळ, कन्नडसह अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबतही त्यांनी चित्रपटात काम केले होते. जयललिता यांच्या ’अथी पराश्क्ती’ या चित्रपटात त्यांनी बाल कराकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जयललिता यांनी ’शक्ती देवी’ची तर श्रीदेवी यांनी त्यांच्या माडीवर बसलेल्या बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. 1976 मध्ये श्रीदेवी यांनी ’सोलावां सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ’हिम्मतवाला’ चित्रपटाने त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली होती.
कामाच्या समर्पणाच्या बाबतीत इतर अभिनेत्रींपेक्षा श्रीदेवी नेहमीच पुढे राहिल्या. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्या लंडनमध्ये शूटिंग करत होत्या. तिथे वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच त्या भारतात परतल्या आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर ताबडतोब लंडनमध्ये निघून गेल्या आणि उर्वरित चित्रीकरण पूर्ण केले. इतकेच नाही तर ’चालबाज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांना 103 डिग्री ताप होता, पण त्यांनी विश्रांती न घेता गाण्याचे शूटिंग उत्साहाने पूर्ण केले.
बोनी कपूर यांनी श्रीदेवीला 70 च्या दशकात एका तामिळ चित्रपटात पाहिले होते. बोनी त्यांना बघताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या लव्ह स्टोरी मिस्टर इंडिया या चित्रपटासोबत सुरु झाली होती. श्रीदेवी यांनी फक्त स्क्रिप्ट ऐकण्यासाठी बोनी यांना 10 दिवस वाट बघायला लावली होती. श्रीदेवीला साइन करण्यासाठी त्यांच्या आईने 10 लाख रुपये फी मागितली होती. मात्र बोनी यांनी 11 लाख रुपये देऊन श्रीदेवी यांना साइन केले होते.
श्रीदेवी यांची सर्वात जास्त जयप्रदाशी यांच्याशी होती. दोघींनाही एकमेकींकडे बघणे किंवा बोलणे आवडत नव्हते. एकदा दोघींमध्ये पॅचअप घडवण्याच्या उद्देशाने राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी त्यांना 2 तास एका खोलीत बंद ठेवले होते. जेव्हा दार उघडले तेव्हा दोघीही वेगवेगळ्या कोप-यात बसून असल्याचे दिसून आले. एकाच खोलीत दोन तास राहूनदेखील त्यांनी एकमेकींकडे बघितले नव्हते.
प्रसिद्ध दिग्दर्शक स्पीलबर्गने यांनी एका भूमिकेसाठी श्रीदेवीची निवड केली होती, परंतु श्रीदेवी यांनी त्यांना थेट आपला नकार दिला होता. त्यांनी हॉलिवूडच्या गाजलेल्या ज्युरासिक पार्क या चित्रपटाला नकार दिला होता. श्रीदेवी यांना भारतीय चित्रपटांची ओढ होती. त्यांना अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण त्यांनी त्यामध्ये रस दाखवला नाही. महाकालच्या भक्त होत्या, सकाळी व संध्याकाळ पूजा करायच्या.
श्रीदेवी यांची महाकाल मंदिर आणि मीनाक्षी मंदिरावर श्रद्धा होती. आऊटडोअर शूटिंग वळगता त्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करायच्या. जेव्हा श्रीदेवी मध्यप्रदेशमध्ये जायच्या तेव्हा आवर्जुन उज्जैनला भेट द्यायच्या. त्या महाकालच्या मोठ्या भक्त होत्या. याशिवाय आपल्या फिटनेससाठी त्या वर्कआउट आणि योगा करायच्या. ज्या ज्या शहरात त्या जात असे तेथे हेअरस्पेस आवर्जुन करायच्या.