sports

जिल्ह्यात 875 बाधित; 19 बाधितांचा मृत्यू

एकूण बाधितांची संख्या 17,663

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, जिल्ह्यात शुक्रवारी 875 जण बाधित झाले तर 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, जिल्ह्यात शुक्रवारी 875 जण बाधित झाले तर 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे. 

जिल्ह्यात आणखी 753 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 753 जण कोरोनामुक्त झाले असून, 917 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

917 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 12, उपजिल्हा रुग्णालय, कराड 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 54, कोरेगाव 128, वाई 80, खंडाळा 110, रायगाव 78, पानमळेवाडी 126, मायणी 19, महाबळेश्‍वर 40, दहिवडी 30, खावली 45 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 181 अशा एकूण 917 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.