maharashtra
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास जिल्हाधिकारी यांची तात्काळ मंजूरी
अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा करुन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली.
सातारा : दिनांक 1 व 2 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा करुन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली.
प्रथम टप्प्यात उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील सुमारे 350 एकर क्षेत्रावर पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी देवून, उर्वरीत क्षेत्रासाठी तातडीने निधीची मागणी सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृषी विभागास दिल्या आहेत.