immediateapprovalofdistrictcollectorforsupplyofcropprotectiondrugstostrawberrygrowers

esahas.com

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास जिल्हाधिकारी यांची तात्काळ मंजूरी

अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा करुन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली.