उरमोडी नदीने घेतला मोकळा श्वास!
राजू भोसले व गजवडी ग्रामस्थांचे श्रमदान; 15 ट्रॉली कचरा संकलित
उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचर्याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणार्या गावांना होत असल्याने याची दखल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी घेतली. गजवडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधत या परिसरात श्रमदान सुरू केले. रविवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, गजवडीचे सरपंच बल्लाळ,
सोनवडी : उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचर्याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणार्या गावांना होत असल्याने याची दखल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी घेतली. गजवडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधत या परिसरात श्रमदान सुरू केले. रविवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, गजवडीचे सरपंच बल्लाळ, उपसरपंच धनाजी कदम यांच्या उपस्थितीत श्रमदानास सुरुवात करण्यात आली.
यावेळी हा परिसर जेसीबी मशीन, ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुमारे 15 ट्रॉली कचरा उचलण्यात आला. परिसरात रंगरंगोटी करून सुशोभीकरण करीत कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. या नदीपात्रातच अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत, आता या सर्व गावांना शुद्ध पाणी मिळेल. या परिसरातील गावांतून जे व्यावसायिक आहेत त्यांनाही ग्रामपंचायतीने कचरा न टाकण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
या श्रमदानात गजवडीचे ग्रामसेवक वायदंडे, सचिन बळीप, गजानन पिंपळे, तुषार कदम, योगेश माने, दत्तात्रय बळीप, धीरज कदम, सुनील जाधव, अमित बल्लाळ, राजू बल्लाळ, उमेश बळीप, विराज पवार, नवनाथ सपकाळ, दिनकर कदम, विशाल कदम, जुबेर इनामदार, ज्ञानदेव अडगळे, दिलीप धोंदवड, धनंजय कदम, अजमुद्दिन पटेल, हिंदुराव कदम, जीवनदास कदम या युवकांनी सहभाग घेतला होता.
गावकर्यांनी एकत्रित येऊन श्रमदान करावे..
गावच्या हिताची कामे करताना प्रशासनावर अवलंबून न राहता गावकर्यांनी एकत्रित येऊन श्रमदान केल्यावर स्वच्छता मोहीम तर होतेच; पण गावची एकीही दिसून येते. गावोगावी आपले नदी, नाले, ओढे, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी स्वच्छ केल्या तर रोगराई पसरणार नाही.
- राजू भोसले, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सातारा.
स्वच्छतेने पर्यटनाचा दर्जा उंचावेल
परळी खोरं म्हटले की, निसर्गाचा वरदहस्त त्यातच उरमोडी जलाशयाचे विहंगम दृश्य, सज्जनगडचा विस्तीर्ण डोंगर अन् ठोसेघरचा कोसळणारा धबधबा यांसारखी पर्यटन स्थळे पाहायला हजारो पर्यटक हे या भागात येत असतात. परंतु, कचर्याचे साम्राज्य पाहिल्याने पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते. आपण जर स्वच्छता ठेवली तर नक्कीच या भागातील पर्यटनाचा दर्जा ही तितकाच वाढेल.
- धनाजी कदम, उपसरपंच, गजवडी.


