जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 120 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 120 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 120 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 120 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
459 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कराड 65, फलटण 67, कोरेगाव 15, वाई 35, रायगाव 27, पानमळेवाडी 10, महाबळेश्वर 30, दहिवडी 34 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 58 अशा एकूण 459 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


