sports

निमसोडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

कडेगांव तालुक्यातील घटना ; चुलता व चुलतभावा विरुद्ध गुन्हा दाखल

कडेगाव तालुक्यातील निमसोड येथील जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सूर्यकांत उर्फ सुरेश आत्माराम जाधव वय 35 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सूर्यकांत यांचे चुलते भगवान दाजी जाधव वय 60 व त्यांचा मुलगा कैलास भगवान जाधव वय 42 दोघेही राहणार निमसोड यांच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी कडेगाव तालुक्यातील निमसोड मध्ये जाधव कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून स्थायिक आहेत.सूर्यकांत व त्यांचे चुलते भगवान जाधव चुलत भाऊ कैलास जाधव यांचा गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा वाद सुरू आहे आज सायंकाळी त्यांच्यातील हा जमिनीचा वाद पुन्हा उफाळून आला या वादातून भगवान जाधव व त्यांचा मुलगा कैलास आणि सूर्यकांत जाधव याच्यात बाचाबाची सुरु झाली त्याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी जवळच पडलेला लाकडी दांडक्याने संशयित कैलास जाधव याने सूर्यकांत याच्या डोक्यात तडाखे मारले त्यामुळे सूर्यकांत याचा डोक्याला मोठी गंभीर इजा झाली त्यानंतर सूर्यकांत यांना तालुक्यातील कडेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.