sports

जिल्ह्यात दिवसभरात 59 जण कोरोनाबाधित

72 नागरिकांना डिस्चार्ज; 406 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 59 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

सातारा :  जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 59 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 72 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 406 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, कराड 39, फलटण 6, कोरेगाव 11, वाई 39, खंडाळा 2,  रायगाव 20, पानमळेवाडी 107, महाबळेश्‍वर 2, पाटण 3, दहिवडी 49, तळमावले 17, म्हसवड 22, तरडगाव 15 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 58 असे एकूण 406 जणांचा यामध्ये समावेश आहे.