sports

विजयकुमार बाचल ‘गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानिन


येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड  प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. 

नागठाणे : येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड  प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. 

यावेळी नितीन सुरवसे, राजेंद्र पवार, नितीन काकडे, चारुशीला लोखंडे या राज्यातील शिक्षकांनाही गौरविण्यात आले. 

बाचल हे सध्या तासगाव (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षक असा त्यांचा लौकिक आहे. 

गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख अंकुश तसेच सरिता इंदलकर, संदीपभाऊ शिंदे, बाळासाहेब साळुंखे, अरुण कांबळे, विजय काळे तसेच नागठाणे, तासगाव ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.