सातारा येथील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राजवळ एक अज्ञात कार अंगावरुन गेल्याने नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या सिल्व्हर रंगाची कार चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राजवळ एक अज्ञात कार अंगावरुन गेल्याने नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या सिल्व्हर रंगाची कार चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सहायक पोलीस उपनिरीक्षक अजित जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नागेश भिवटे हा दारुच्या नशेत किंवा चक्कर आल्याने पोलीस करमणूक केंद्राजवळ असलेल्या कच्छी क्लासिक अपार्टमेंटसमोर पडला होता. त्यावेळी राजवाड्याच्या दिशेने निघालेल्या सिल्व्हर रंगाची कार भिवटे यांच्या अंगावरुन गेली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर संबंधिक कारचालक तेथून पसार झाला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचा तपास करत होते. पोलिसांनी घटनास्थळीचे फुटेज तपासल्यानंतर सिल्व्हर रंगाच्या एका कारने त्याला धडक दिली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दि. १0 ऑक्टोबर रोजी सातारा शहर पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जगताप करत आहेत.