crimeonanunidentifiedfourwheelerdriverinthedeathofone

esahas.com

एकाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकावर गुन्हा

सातारा येथील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राजवळ एक अज्ञात कार अंगावरुन गेल्याने नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या सिल्व्हर रंगाची कार चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.