sports

जिल्ह्यात दिवसभरात 64 कोरोनाबाधित

सोमवारी 3 बाधितांचा मृत्यू : 230 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 230 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 230 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 230 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 230 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

379 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 37, कराड 20, फलटण 14, कोरेगाव 7, वाई 13, खंडाळा 12, रायगाव 60, पानमळेवाडी 42, मायणी 14, महाबळेश्‍वर 35, दहिवडी 15, खावली 21, तळमावले 5, म्हसवड 18, तरडगाव 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 53 अशा एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.