जिल्ह्यात दिवसभरात 913 कोरोनाबाधित
गुरुवारी उपचारादरम्यान 27 बाधितांचा मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 27,362
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 913 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असताना कोरोनावर मात करूनही अनेकजण घरी परतत आहेत. आतापर्यंत एकूण 17,107 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 913 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असताना कोरोनावर मात करूनही अनेकजण घरी परतत आहेत. आतापर्यंत एकूण 17,107 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
583 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 583 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1269 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, उपजिल्हा रुग्णालय, कराड 41, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 53, कोरेगाव 67, वाई 115, खंडाळा 164, रायगाव 75, पानमळेवाडी 291, मायणी 79, महाबळेश्वर 95, पाटण 7, दहिवडी 45, तळमावले 41, व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 181 अशा एकूण 1269 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


