sports

अवैध दारू धंद्यांवर छापे, 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त


सातारा : सातारा शहरात अवैध दारूधंद्यांवर पोलिसांनी छापे टाकून 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत माहिती अशी, भिमाबाई आंबेडकर नगर येथील म्हाडा कॉलनीत असलेल्या एका बिल्डिंगच्या तळमजल्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 4 हजार 420 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या 36 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी स्वप्नील सुभाष घुसाळे रा. म्हाडा कॉलनी, सातारा यास सीआरपीसीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी तांदूळआळी येथील नगरवाचनालयासमोरील बोळात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यावर छापा टाकून 2 हजार 320 रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या 12 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी सागर राजेंद्र खोदे वय 29 रा. खणआळी यास सीआरपीसीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे.