जिल्ह्यात दिवसभरात 153 कोरोनाबाधित
बुधवारी 5 बाधितांचा मृत्यू : 177 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 51,522
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 153 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 153 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 177 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 177 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
392 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 30, कराड 12, फलटण 25, कोरेगाव 25, वाई 22, खंडाळा 25, रायगाव 18, पानमळेवाडी 46, मायणी 13, महाबळेश्वर 5, दहिवडी 12, खावली 33, तळमावले 9, म्हसवड 19, पिंपोडे 7, तरडगाव 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 60 अशा एकूण 392 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.