अर्जुन तेंडुलकर हा एक नवखा क्रिकेटपटू असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच खझङ 2021 साठीचा लिलाव पार पडला. त्या लिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने 20 लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. अनेक मोठे खेळाडूंवर बोली लागली नाही पण अर्जुनला मुंबईने विकत घेतलं. त्यामुळे अर्जुनवर टीका करण्यात आली. केवळ वडिलांच्या नावावर त्याला संधी मिळाली असल्याचे बोलले गेले. पण त्याच्यावरील सार्या टीकेला त्याची बहिण सारा हिने सणसणीत उत्तर दिलं.

सारा आपल्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. भारताचा सलामीवीर शुबमन गिल याच्यासोबत तिचं अफेयर असल्याच्या चर्चाही काही महिन्यांपासून रंगल्या आहेत. पण सध्या सारा अर्जुनची पाठराखण केल्याने चर्चेत आहे. साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर तिने एक कॅप्शन लिहीत टीकाकारांना उत्तर दिलं. तुला खझङमध्ये जे स्थान आणि संधी मिळाली आहे ती केवळ तुझ्या स्वत:च्या मेहनतीच्या बळावर मिळाली आहे. याचं श्रेय कोणीही तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे, अस साराने फोटोवर लिहिलं आहे.
दरम्यान, अर्जुन वडिलांप्रमाणे फलंदाज नसून वेगवान गोलंदाज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव खझङच्या लिलावात आलं तेव्हा मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाखांच्या मूळ किंमतीत संघात घेतलं. अर्जुनला मुंबई इंडियन्सने संघात घेतल्यानंतर सोशल मीडियावर नेपोटिझमची (घराणेशाही) चर्चा रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे आता अर्जुनला मुंबईच्या अंतिम 11 मध्ये संधी मिळते का? आणि तो कशी कामगिरी करतो? याकडे सार्यांचे लक्ष आहे.