sports

जिल्ह्यात दिवसभरात 82 कोरोनाबाधित

शुक्रवारी एका बाधिताचा मृत्यू : 20 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,483

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 20 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 20 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

125 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 9, फलटण 8, वाई 28, रायगाव 11, पानमळेवाडी 35, तळमावले 18, म्हसवड 16 अशा एकूण 125 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.