जिल्ह्यात बाधितांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा
रविवारी दिवसभरात सर्वाधिक 443 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून वेगाने संसर्ग पसरू लागला आहे. 6 ऑगस्टला 5 हजार बाधित होते तर अवघ्या 17 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होवून दि. 23 रोजी बाधितांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी 443 नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता 10,157 इतकी झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून वेगाने संसर्ग पसरू लागला आहे. 6 ऑगस्टला 5 हजार बाधित होते तर अवघ्या 17 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होवून दि. 23 रोजी बाधितांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी 443 नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता 10,157 इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 10 बळी गेले आहेत.
आणखी 157 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 157 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील 4, कराड 7, खंडाळा 19, खटाव 7, कोरेगाव 4, महाबळेश्वर 1, माण 1, पाटण 3, फलटण 30, सातारा 76, वाई तालुक्यातील 5 अशा एकूण 157 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
- 218 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 10, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 108, रायगाव 40, पानमळेवाडी 33, मायणी 16, महाबळेश्वर 11 अशा एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


