जिल्ह्यात दिवसभरात 512 कोरोनाबाधित
बुधवारी 23 बाधितांचा मृत्यू : 385 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 37,812
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 512 बाधितांची नोंद झाली असून, 23 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 512 बाधितांची नोंद झाली असून, 23 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 385 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 385 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
778 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 60, कराड 26, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 65, कोरेगाव 52, वाई 55, खंडाळा 76, रायगाव 96, पानमळेवाडी 97, मायणी 6, महाबळेश्वर 25, दहिवडी 60, खावली 14, तळमावले 28, म्हसवड 19, पिंपोडा 19 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 80 अशा एकूण 778 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


