जिल्ह्यात दिवसभरात 205 कोरोनाबाधित
गुरुवारी 5 बाधितांचा मृत्यू : 174 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 47,609
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 205 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 174 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 205 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 174 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 174 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 174 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
339 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 26, कराड 9, कोरेगाव 39, वाई 21, खंडाळा 34, रायगाव 66, पानमळेवाडी 11, मायणी 9, महाबळेश्वर 20, पाटण 6, दहिवडी 39, खावली 7, पिंपोडे 6 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 46 अशा एकूण 339 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


