जिल्ह्यात उच्चांंकी 505 कोरोनाबाधित
उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 11,643
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. बुधवारी आतापर्यंतचे उच्चांकी 505 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत 11,643 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. बुधवारी आतापर्यंतचे उच्चांकी 505 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत 11,643 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आणखी 135 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 135 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जावली तालुक्यातील 3, कराड 13, खंडाळा 1, खटाव 4, कोरेगाव 6, महाबळेश्वर 4, पाटण 7, फलटण 67, सातारा 27, वाई 3 अशा एकूण 135 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.455 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 8, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 61, कोरेगाव 53, वाई 39, खंडाळा 30, रायगाव 30, मायणी 56, महाबळेश्वर 21, दहिवडी 11, खावली 19 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 127 अशा एकूण 455 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


