sports

जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा

युवराज नाईक यांचे आवाहन : छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात 

हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण  करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणार्‍या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणार्‍या क्रीडापटूला ‘ध्यानचंद जीवन गौरव’ पुरस्क

सातारा : ‘हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण  करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणार्‍या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणार्‍या क्रीडापटूला ‘ध्यानचंद जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. समाजातील तरुण-तरुणींनी अभ्यासातील गुणवत्तेबरोबरच विविध खेळांच्या माध्यमातून क्रीडा नैपुण्य प्राप्त करून आपला जिल्हा, राज्य व देशाचा नावलौकिक वाढवावा. सातारा जिल्ह्याला अनेक आजी-माजी महान खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याची थोर परंपरा आहे. क्रीडा क्षेत्रात गौरवशाली परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी आपल्या अंगी असलेल्या क्रीडा नैपुण्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा,’ असे आवाहन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले. 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी सातारा येथील नामवंत क्रीडापटू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू विश्‍वतेज मोहिते, माया मोहिते, सुजीत शेडगे, आदित्य अहिरे यांच्या हस्ते व सातारा जिल्हा व अ‍ॅथेलेटिक्स मार्गदर्शक कालिदास गुजर, कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर.वाय. जाधव, सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे व सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे आणि सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव राजेंद्र माने, सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कल्याण शिंदे, क्रीडाप्रेमी मोहन पवार आणि सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी अतनुर, कोळी तसेच क्रीडा कार्यालयातील कर्मचार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी शिवछत्रती पुरस्कार प्राप्त विश्‍वतेज मोहिते, माया मोहिते आणि यशवंत गायकवाड यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.

राजेंद्र माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोळी यांनी आभार मानले.