वडूज : येथील प्रा. अजय वसंतराव शेटे यांची पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी पदी निवड झाली आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर साहेब यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामंत्री भगवानराव बागल, अनिल कचरे यांनी शेटे यांना नियुक्तीचे पत्र दिले. पंतप्रधान जनकल्याण योजनांचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मिळवून देण्याचा आपण मनापासून प्रयत्न करू असे यावेळी प्रा. शेटे यांनी सांगितले.
त्यांच्या निवडी बद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनिलभाऊ देसाई, डॉ. दिलीपराव येळगावकर, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी पाठक, महिला अध्यक्षा सुलोचना चौधरी, तसेच भा.ज.पा. व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मान्यवर पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.