sports

' ताकारी ' तून आळसंद तलाव‌ भरण्यासाठी प्रयत्नशील‌‌ : आमदार बाबर


आळसंद तलावातून‌‌ विटा शहरासह आळसंद , खंबाळे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या तलावातील पाणी साठा खालावला आहे. ताकारी योजनेतून आळसंद तलावात भरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. आळसंद ( ता.खानापूर ) येथील आळसंद तलावातील पाणीसाठा कमालीचा‌ खालावला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते‌ पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार बाबर म्हणाले, सध्या आळसंद तलाव ताकारी सिंचन भरणे आवश्यक आहे. विटा शहरासह आळसंद , खंबाळे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. पंरतु तलावातील पाणी साठा कमी झाला आहे. तसेच तलावाच्या कार्यक्षेत्रातील‌ पिके पाण्यावाचून करपून जाण्याची शक्यता आहे. अगोदरच कोरोना ने शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. अशा भीषण परिस्थिती तलाव‌‌ ताकारी योजनेचे पाणी सोडून भरणे आवश्यक आहे. दरम्यान आमदार बाबर यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक श्री. नाईक चर्चा केली. त्यांनी ताकारी योजनेचे पाणी तलावात सोडण्यासाठी सकारात्मक दर्शविली आहे. यावेळी विटा शहर शिवसेना प्रमुख राजू जाधव , समीर कदम , अमर जाधव यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.