‘मागील अनेक वर्षांपासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल,’ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांनी दिले.
सातारा : ‘मागील अनेक वर्षांपासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल,’ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगरचे राज्य कोअर कमिटी सदस्य बी. डी. जाधव व पी. डी. वाघमारे यांच्या समवेत नांदेड येथे झालेल्या चर्चेप्रसंगी शिक्षण मंत्री गायकवाड यांनी आश्वासन दिले. या वेळी सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत निवेदन देण्यात आले.
संच मान्यतेत 2014-15 सालापासून शारीरिक शिक्षकाबरोबर दोन भाषा शिक्षक, एक गणित-विज्ञान शिक्षक, कला व कार्यानुभव शिक्षक दाखवले जात नव्हते. या नवीन निकषाने मात्र ते संचमान्यतेत घेतले जाणार असल्याने शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर समन्वय समिती व अमरावती महामंडळाच्यावतीने मंत्र्यांचे जाधव बी. डी. यांनी अभिनंदन केले. संचमान्यतेतील नवीन निकषात मात्र शारीरिक शिक्षक पद हे आठवे दाखवले जाणार असल्याने मराठवाड्यासह दुर्गम भागात कमी पटसंख्येच्या शाळेवर हे पद अस्तित्वात राहणार नसल्याने भविष्यात अशा शाळेत शारीरिक शिक्षक भरती होणार नसल्याचे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
14 मे 1987 च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा तेथे किमान एक शारीरिक शिक्षक असावा तसेच त्याची पदभरती करताना बायफोकल पद्धतीने करण्या संदर्भात, तसेच फीट इंडिया मुव्हमेंट राबवण्यासाठी शिक्षकाला आधीच शाळे वेळेव्यतिरिक्त वेळ द्यावा लागत असून फीट इंडिया अंतर्गत विविध चाचण्या घेण्यासाठी व त्याचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम वाढणार असल्याने अतिरिक्त शारीरिक शिक्षकाची गरज भासणार आहे. त्यामुळे दुसर्या शारीरिक शिक्षकाचे संचमान्यतेत 15 वे पद हे निर्धारित करावे, पवित्र पोर्टलमधील पूर्ण कार्यभाराची अट काढून बायफोकल पद्धतीने नव्याने शारीरिक शिक्षक पदभरती करण्यात यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिकपासून शारीरिक शिक्षकाची केंद्राला शिफारस करावी या व इतर मागण्यासंदर्भात जाधव यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिक्षणमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेऊन संचमान्यतेबाबत आश्वासक पाऊल उचलण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला


