sports

जिल्ह्यात दिवसभरात 50 कोरोनाबाधित

गुरुवारी 22 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 50 बाधितांची नोंद झाली असून, 22 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 50 बाधितांची नोंद झाली असून, 22 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 22 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 22 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

260 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 30, कराड 24, फलटण 15, कोरेगाव 4, वाई 40, खंडाळा 18, रायगाव 28, पानमळेवाडी 12, महाबळेश्‍वर 10, दहिवडी 14, म्हसवड 6, पिंपोडे 6, तरडगाव 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 32 अशा एकूण 260 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.