sports

भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके येथील कोरोना योद्धांचा सन्मान


कोरोनाच्या युध्दात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या योध्दांना प्रेरणा मिळण्यासाठी भाजपा कराड दक्षिणच्यावतीने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर, आशा सेविका, प्रशासकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे कोरोना लढ्यात महत्वाचे योगदान आहे. - पै. धनाजी पाटील, अध्यक्ष कराड दक्षिण भाजपा

वाठार प्रतिनिधी / सुरेश माने 

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने कराड दक्षिण मतदारसंघातील गावातील कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याच एक भाग म्हणून आटके येथील कोरोना योद्धांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेविका, सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, डॉक्टर, मेडीकल चालक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे कर्मचारी   यांनी कोरोना काळात घेतल्याला श्रमाचे मोल जपण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने या कोरोना योद्धांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणचे अध्यक्ष पै. धनाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय पवार, जि. प. सदस्या शामबाला घोडके, धनाजी माने खूबीकर, महिला आघाडीच्या सारिखा गावडे, तानाजी देशमुख, किशोर पवार, राहूल पाटील, कुबेर माने, दिग्विजय पाटील, पकंज निकम, अभिजित पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते.