जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून, संसर्ग वेगाने पसरत आहे. शनिवारी दिवसभरात 827 बाधित आढळले तर 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून, संसर्ग वेगाने पसरत आहे. शनिवारी दिवसभरात 827 बाधित आढळले तर 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
697 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 697 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1003 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1003 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, उपजिल्हा रुग्णालय कराड 74, उपजिल्हा रुग्णालय फलटण 72, कोरेगाव 92, वाई 106, खंडाळा 153, रायगांव 90, पानमळेवाडी 72, मायणी 105, महाबळेश्वर 60, तळमावले 9, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 149 असे एकूण 1003 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


