आपण आपल्या ठिकाणी सुरू असणाऱ्या कोविड सेवाकार्यात आपले योगदान द्यावे, त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील . - शेखर चरेगावकर
सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपाचे माध्यम प्रतिनिधी, सहकार आघाडीचे संयोजक व यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगांवकर यांचा ५ ऑक्टोबर हा वाढदिवस. दरवर्षीच अत्यंत साधेपणाने, कोणतेही बोर्ड न लावता, मिठाई, भेटवस्तू, बुके असा खर्च न करता वाढदिवस साजरा केला जातो. असा होणारा सर्व खर्च हा सामाजिक उपक्रमावर खर्च केला जातो. सध्या कोरोनाशी सर्वजण लढत आहेत. याचा विचार करता सर्वानी आपल्या ठिकानाहूनच फोनद्वारे, एसएमएस द्वारे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाढदिवस शुभेच्छा द्याव्यात, अशी विंनती शेखर चरेगांवकर यांनी केली आहे. आपण आपल्या ठिकाणी सुरू असणाऱ्या कोविड सेवाकार्यात आपले योगदान द्यावे, त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असे आवाहनही त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.


