जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकरी व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या शेतकरी व उद्योजक महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र कष्ट करीत असतात, अशा महिलांना सक्षम महिला सन्मान हा पुरस्कार स्व. जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
सातारा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकरी व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या शेतकरी व उद्योजक महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र कष्ट करीत असतात, अशा महिलांना सक्षम महिला सन्मान हा पुरस्कार स्व. जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने सक्षम महिला सन्मान पुरस्कार हा परळी खोर्यातील शेतकरी महिलांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सातारा तालुकाध्यक्ष मिथिलेश लाड, ओमकार यादव, केदार कुलकर्णी, प्रतीक निपाणी, अनिकेत यादव, यश अरलूलकर, अरबाज सय्यद, प्रसाद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
परळी खोर्यामध्ये काम कणार्या शेतकरी व उद्योजक महिला संध्या चंद्रकांत पानसरे, स्मिता नीलेश जाधव, रेखा पांडुरंग देशमुख, सीमा चंद्रकांत पवार, ललिता मोहनराव यादव यांना प्रशस्तिपत्र व झाडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.


