sports

‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

वीज बिलाच्या माफी द्यावी ः थकित उस बिलाचीही मागणी

2019-20 च्या गळीत हंगामाचे ऊस बिल व शेतकर्‍यांना वीज वितरणने आकारलेली अवाच्या सव्वा वीज बिले यामधून माफी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

 


सातारा : 2019-20 च्या गळीत हंगामाचे ऊस बिल व शेतकर्‍यांना वीज वितरणने आकारलेली अवाच्या सव्वा वीज बिले यामधून माफी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, राज्य कार्यकारीणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील संजय महामूलकर दादासाहेब यादव इं सदस्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन सादर केले . निवेदनात नमूद आहे की , महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेअंर्तगत कर्जदारास पन्नास हजार रू प्रोत्साहन पर अनुदान तातडीने द्यावे, सातारा जिल्ह्यात अपुर्‍या पावसामुळे मंडल निहाय सर्वेक्षण करून त्यानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, 2019-20 च्या गळीत हंगामाची बिले तत्काळ मिळावी व एफआरपी कायद्याचा भंग करणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे . या मागण्याचा शासनाने गांभीर्याने विचार न झाल्यास दि 17 ऑगस्ट पासून किसन वीर कारखान्याचे चेअरमन यांच्या सदर बझार येथील निवासस्थानासमोर निदर्शनं करून व्यापक आंदोलनाची सुरवात होईल असा