sports

जिल्ह्यात दिवसभरात 156 कोरोनाबाधित

शनिवारी 11 बाधितांचा मृत्यू : 393 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,531

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 156 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 393 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 156 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 393 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 393 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 393 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

317 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, कराड 25, कोरेगाव 38, वाई 42, खंडाळा 28, रायगाव 31, पानमळेवाडी 9, मायणी 12, महाबळेश्‍वर 26, दहिवडी 23, म्हसवड 3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 53 अशा एकूण 317 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.