जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 84 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 84 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
454 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23, कराड 10, फलटण 10, वाई 26, खंडाळा 3, रायगाव 46, पानमळेवाडी 88, महाबळेश्वर 10, दहिवडी 29, खावली 57, तळमावले 40, म्हसवड 13, तरडगाव 13, व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 88 अशा एकूण 454 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.