sports
सचिन ढवण यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे गौरव
कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान
वाठार प्रतिनिधी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तलाठी सचिन ढवण यांना सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. तलाठी सचिन ढवण यांनी मालखेड व बेलवडे बुद्रुक येथे उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. सध्या ते तांबवे येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय मालखेड येथे कृष्णा नदीला आलेल्या पुरस्थिती काळात ही त्यांनी उत्तम कामगिरी केली होती.


