जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न
जावली तालुक्यातील प्राथमिक शिक्षिकांच्या उपक्रमाचे कौतूक
कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे, प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व
कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे, प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पूर्वीचा काळ वेगळा होता. विद्युतीकरण कुठेच नव्हते यातच ग्रामीण भागात शेत शिवारातून निघालेले. धान्य जात्यावर दळून कसदार अन्न पूर्वीच्या लोकांना मिळत होते. आणि त्या वेळेची पिढी सुदृढ आणि सक्षम असायची असं इतिहास बोलतो. खरे तर पूर्वीच्या काळात जात्यावरच्या ओव्या या ग्रामीण महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. आजच्या सोशल मीडियाच्या या काळात खेड्यापाड्यात असणारी जाती व जात्यावरील ओव्याही ग्रामीण भागातून कालबाह्य झाल्या आहेत.
मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे, प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची. त्याची गोडी अवीट होती. म्हणूनच बहिणाबाईंची गाणी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आजही आपण गुणगुणल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मनोरंजनातून तुम्हा सर्वांचे प्रबोधन करण्यासाठी या ओव्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्रातील स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात .जेणेकरून आपल्या कष्टाचा विसर पडू नये म्हणून मनाची कवाडे उघडून अनुभवायचं पीठ बाहेर पडलं जावं आणि त्या कष्टाचा विसर पडावा. तुमचे प्रबोधन व्हावे, हाच मूळ उद्देश धरून सातारा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती जावलीच्या शिक्षकांनी याचं आव्हान पेलले आणि ती तडीस नेले. तेही कोरोना टेस्ट करूनच या शिक्षिका एकत्र आल्या. आमच्या या व्हिडिओचा उद्देश फक्त जनजागृती करणे आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही. यासाठी मार्गदर्शन गटविकास अधिकारी सतिश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, तहसिलदार राजेंद्र पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी कर्णे सर्व केंद्रप्रमुख, अजित राक्षे तसेच सर्व शिक्षक सहकारी, यांनी प्रेरणा दिल्याचे या शिक्षकांनी सांगितले. या ओव्यांचे सादरीकरण योगिता मापारी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा), सौ. अंजली गोडसे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी), प्रियांका किरवे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगडीवाडी) आणि शिल्पा फरांदे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा) यांनी केले आहे.