sports

जिल्ह्यात 498 बाधित

कोरोनाचा विस्फोट : उपचारादरम्यान 15 जणांचा मृत्यू 

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णसंख्येचा वेग सातारकरांना चिंतेत टाकू लागला आहे. रविवारीदेखील 498 बाधित आढळून आले तर 15 रुग्णांचा उपचारादररम्यान मृत्यू झाला आहे. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णसंख्येचा वेग सातारकरांना चिंतेत टाकू लागला आहे. रविवारीदेखील 498 बाधित आढळून आले तर 15 रुग्णांचा उपचारादररम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात आणखी 306  जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 306 जण कोरोनामुक्त झाले असून, 303 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

303 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 63, खंडाळा 52, रायगाव 20, पानमळेवाडी 40, मायणी 93, महाबळेश्‍वर 15 अशा एकूण 303 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.