जिल्ह्यात दिवसभरात 134 कोरोनाबाधित
शुक्रवारी 5 बाधितांचा मृत्यू : 233 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,754
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 134 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 233 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 134 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 233 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 233 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 233 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
247 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कराड 14, फलटण 11, कोरेगाव 21, वाई 21, खंडाळा 15, रायगाव 49, पानमळेवाडी 3, मायणी 16, महाबळेश्वर 10, दहिवडी 20, तळमावले 10, म्हसवड 7, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 45 अशा एकूण 247 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


