sports

वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

जिल्ह्यात दिवसभरात 1933 कोरोना बाधित : 39 जणांचा मृत्यू 

जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे जावली 85 (4324), कराड 226 (14686), खंडाळा 145 (5774), खटाव 261 (7838), कोरेगांव 148 (7889), माण 176 (5323), महाबळेश्‍वर 47 (3120), पाटण 81 (3770), फलटण 259 (11779), सातारा 346 (21505), वाई 140 (7154 ) व इतर 19 (457) असे आज अखेर एकूण 93 हजार 619 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत.

तसेच दिवसभरात 39 बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या ः जावली 3(95), कराड  4 (408),  खंडाळा 1 (78), खटाव 6 (229), कोरेगांव 3 (222), माण 2  (126), महाबळेश्‍वर 0 (28), पाटण 2 (112), फलटण 5 (168), सातारा 6 (692), वाई 7 (171) , व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2329 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.