जिल्ह्यात दिवसभरात 345 कोरोनाबाधित
गुरुवारी 19 बाधितांचा मृत्यू : 455 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 40,981
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 345 बाधितांची नोंद झाली असून, 19 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 455 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 345 बाधितांची नोंद झाली असून, 19 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 455 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 455 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 455 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
609 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 55, कराड 23, फलटण 27, कोरेगाव 27, वाई 65, खंडाळा 60, रायगाव 45, पानमळेवाडी 99, मायणी 13, महाबळेश्वर 10, पाटण 22, दहिवडी 26, खावली 16, म्हसवड 25, पिंपोडे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 83 अशा एकूण 609 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


