sports

जिल्ह्यात दिवसभरात 850 कोरोनाबाधित

बुधवारी 30 बाधितांचा मृत्यू : 587 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 33,072

जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी दिवसभरात 850 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 970 झाली आहे.

सातारा : जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी दिवसभरात 850 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 970 झाली आहे.

जिल्ह्यात आणखी 587 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 587 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 984 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

984 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 65, उपजिल्हा रुग्णालय, कराड 24, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 85, कोरेगाव 74, वाई 81, खंडाळा 91, रायगाव 79, पानमळेवाडी 117, मायणी 46, महाबळेश्‍वर 60, पाटण 17, दहिवडी 53, खावली 5 व कृष्णा मेडिकल कॉलेज,  कराड 187 अशा एकूण 984 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.