sports

विट्यात तातडीने दोनशे बेडचे रुग्णालय उभारा

पालकमंत्री ना. जयंत पाटील यांची प्रशासनाला सूचना

जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. खानापूर तालुक्यात कोविड रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार बेड उभारा. प्रसंगी खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्याठिकाणी बेडची व्यवस्था करणं आवश्यक आहे. - मंत्री जयंत पाटील
खानापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने २०० बेडची व्यवस्था करा , अशी सूचना पालकमंत्री ना.जयंत पाटील यांनी. तालुका प्रशासनाला दिल्या. येथील पंचायत समिती मधील (स्व.) संपतराव माने सभागृहात कोविड च्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सभापती महावीर शिंदे, गटविकास अधिकारी संदीप पवार, मुख्याधिकारी अतुल पाटील प्रमुख उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. खानापूर तालुक्यात कोविड रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार बेड उभारा. प्रसंगी खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्याठिकाणी बेडची व्यवस्था करणं आवश्यक आहे. खासदार पाटील म्हणाले, तासगाव च्या धर्तीवर खानापूर तालुक्यातील विट्यात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे. आमदार बाबर म्हणाले, शासकीय रुग्णालयात आॅक्सिजन मशीन ची कमतरता जाणवत आहे. विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दोन आॅक्सिजन मशीन भेट दिल्या आहेत.उर्वरित साहित्य ही दिले जाईल. यावेळी मेडिकल कौन्सिल चे राज्याध्यक्ष विजय पाटील यांनी कोविडवर मात आवश्यक त्या सूचना मांडल्या. त्याला पालकमंत्री ना. पाटील यांनी दुजारा दिला. आढावा बैठकीस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पाटील, डॉ. अविनाश लोखंडे , सहाय्यक निबंधक युसुफ शेख, पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, विनोद पाटील, माधव रोकडे विकास जाधव, राजू जाधव, संजय सागर यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ना.‌ पाटील यांनी करंजे येथील ग्रामस्थांचे गेली अठरा दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास भेट दिली. आठ - दहा दिवसांपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. असे आश्र्वासन दिले. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.