sports

जिल्ह्यात दिवसभरात 147 कोरोनाबाधित

रविवारी 3 बाधितांचा मृत्यू : 20 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 49,879

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 147 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 147 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 20 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 20 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

19 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 व फलटण येथील 17 अशा एकूण 19 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.