sports

जिल्ह्यात दिवसभरात 708 कोरोनाबाधित

मंगळवारी 34 बाधितांचा मृत्यू : 500 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 32,222

जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात 708 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 940 झाली आहे.

सातारा : जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात 708 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 940 झाली आहे.

जिल्ह्यात आणखी 500 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 500 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 807 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

807 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 26, उपजिल्हा रुग्णालय, कराड 16, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 65, कोरेगाव 117, वाई 109, खंडाळा 51, रायगाव 118, पानमळेवाडी 86, मायणी 33, महाबळेश्‍वर 50, दहिवडी 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 97 अशा एकूण 807 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.