sports

गमेवाडीत आढळळा मृत बिबट्या


कराड ः गमेवाडी येथील तळीचा माळ शिवारात हणमंत चंद्रु जाधव यांच्या शेतातील ऊसाची साखऱ कारखान्याला ऊसतोड सरु आहे. त्याला अडचण येवु नये म्हणुन श्री. जाधव हे त्यांच्या शेजारील चंद्रकांत गोविंद जाधव यांचा ऊस दाबायला गेले. ऊस दाबत असतानाच जाधव यांना शेतातील वरंब्यावर बिबट्या पडलेला आढळला. त्यांना काहीकाळ सुचायचेच बंद झाले. तो जागचा हलला नाही त्यामुळे तो मृतावस्थेत पडला असावा, असा त्यांचा अंदाज झाला. त्यादरम्यान ते गमेवाडीत आले. त्यांनी पोलिस पाटील चंद्रकांत जाधव यांना फोन करुन संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी वन विभागाला माहिती दिली आणि ते जाधव यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान तातडीने वनक्षेत्रपाल अ. पो. गमरे, वनरक्षक मंगश वंजारी, शंकर राठोड दाखल झाले. त्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही केली.