जिल्ह्यात दिवसभरात 230 कोरोनाबाधित
मंगळवारी 6 बाधितांचा मृत्यू : 525 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 45,790
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 230 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 525 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 230 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 525 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 525 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 525 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
409 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कराड 14, फलटण 20, कोरेगाव 35, वाई 25, खंडाळा 41, रायगाव 50, पानमळेवाडी 29, महाबळेश्वर 18, दहिवडी 16, खावली 47, म्हसवड 20 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 66 अशा एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


